प्रजासत्ताक दिनी (Republic Day 2023)  म्हणजेच 26 जानेवारी रोजी राजपथावर प्रत्येक राज्य आपलं प्रतिनिधित्व करत असते. महाराष्ट्रातून ठाण्यातील (Thane) वृत्तपत्र विक्रेत्याच्या मुलीची निवड राजपथावरील नृत्यासाठी झाली आहे. प्रजासत्ताक दिनी राजपथावर (Rajpath) जानवी मानकुमरे (Janvi Mankumre) आपला नृत्याविष्कार सादर करणार आहे. एका वृत्तपत्र विक्रेत्याची मुलगी महाराष्ट्राचा प्रतिनिधित्व दिल्लीत करणार असून या गोष्टीचा अभिमान आहे असं तिच्या पालकांनी सांगितलं आहे.