अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) नवा सिनेमा ‘निकम्मा’ (Nikamma) लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर (Nikamma Trailer Release) प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये अभिनेता अभिमन्यु दसानी (Abhimanyu Dasani) हा जबरदस्त लूकमध्ये दिसत आहे. हा चित्रपट १७ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिमन्यु दसानी याच्या आयुष्यात जेव्हा शिल्पाची एन्ट्री होते. तेव्हा त्याच्या आयुष्यात होणारे बदल या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. शिल्पा शेट्टी या चित्रपटामध्ये सुपरवुमनच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटामध्ये शिल्पा शेट्टी, अभिमन्यु दासानी यांच्यासोबतच शर्ली सेतिया, सुनील ग्रोवर आणि समीर सोनी हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. शर्ली आणि अभिमन्यु यांचा रोमँटिक अंदाज या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.