सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील प्रसिध्द मूर्तिकार, चित्रकार दिगंबर अर्जुन कणसे यांनी आज आषाढी एकादशी निमित्त वागदरी येथील प्रसिध्द पांडुरंग मंदिरात अत्यंत सुंदर विठ्ठलाची मूर्ती रांगोळीतून साकरली आहे. कणसे कर्नाटक, महाराष्ट्र व मराठवाडा या भागात उत्तम मूर्तिकार, चित्रकार म्हणुन प्रसिद्ध आहेत. या भागात जत्रा, यात्रा असो त्या गावात जाऊन ग्रामदेवतेची मूर्ती रांगोळीतून साकार करतात. त्यामुळे या भागात त्यांचा नावलौकिक आहे.