फोर्ब्ससारख्या जागतिक किर्तीच्या मासिकानं दखल घेतलेला, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये मानाचे समजले जाणारे सर्वच पुरस्कार आपल्या नावे करणाऱ्या 'पल्याड' या आगामी मराठी चित्रपटाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे. मीडियापासून सोशल मीडियापर्यंत सर्वच ठिकाणी या चित्रपटावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला जात असल्यानं रसिकांनाही हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली आहे. ही उत्सुकता आणखी शिगेला पोहोचवणारा 'पल्याड'चा टिझर (Palyad Teaser)रिलीज करण्यात आला आहे.