मनोरंजनाचा होणार ब्लास्ट, ‘पंचक’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; 5 जानेवारीला होणार प्रदर्शित!

डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने प्रस्तुत 'पंचक' या चित्रपटाचा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर अशी तगडी स्टारकास्ट आहे.