Photo Gallery : CDS बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात; घटनास्थळाचे पहिले Photo व्हायरल

कर्नाटकातील उटीजवळ (Ooty) हेलिकॉप्टर क्रॅश (Army chopper crashe) झालं. महत्त्वाचं म्हणजे या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा समावेश असल्याची माहिती आहे. या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे चार उच्च अधिकारी होते. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. कर्नाटकातील कुन्नूरजवळ निलगिरी कट्टेरी ही दुर्घटना घडली.सूत्रांच्या माहितीनुसार जनरल रावत यांच्या पत्नीसुद्धा यावेळी त्यांच्यासोबतच होत्या.

    नवी दिल्ली : तमिळनाडू येथील कुन्नूर भागात मोठी दुर्घटना घडली आहे. याठिकाणी लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं आहे.

    या अपघातामध्ये चीफ ऑफ डिफेन्स अर्थात CDS म्हणजेच देशाचे संरक्षण प्रमुख बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी हेसुद्धा जखमी झाल्याचं कळत आहे.

    ब्रिगेडियर रँकचे अधिकारी यांच्यासह काही इतरही अधिकारी आणि दोन पायलट यावेळी हेलिकॉप्टरमध्ये होते.एमआय सीरिजमधील हे हेलिकॉप्टर कोईंबतूरच्या सुरूर वायुदल तळावरुन कुन्नूरमधील वेलिंग्टनला जात होतं.

    अचानक हवामानात बदल झाल्यामुळं हा अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. तर, तीन जण जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

    भारतीय हवाई दलानेही ट्विट करत या घटनेबद्दल माहिती दिली आहे. स्थानिक आणि बचावकार्यासाठी पोहोचलेल्यांच्या माहितीनुसार या अपघातामध्ये हेलिकॉप्टरमधील काहीजण आगीमुळे होरपळले आहेत.