आमलकी एकादशी निमित्त माऊलीच्या गाभाऱ्यात मोगरा फुलला!

पुराणांमध्ये या आमलकी एकादशीला अनन्य साधारण महत्त्व आहे. फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळीपूर्वी ही एकादशी येत असल्यामुळे याला रंगभरनी एकादशी असेही म्हणतात.

    मोगरा आणि शेवंतीच्या शुभ्र फुलांनी मंदिर सजलं आहे.
    पंढरपुरात विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं आज आमलकी एकादशी निमित्त विठ्ठल आणि रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
    पंढरपूरच्या मंदिरात मोगरा आणि शेवंतीच्या फुलांची सुंदर, मनमोहक आरास करण्यात आली आहे.

     

    विठ्ठल रुक्मिणी यांचे मुख दर्शन करण्यासाठी अनेक भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत
    आमलकी एकादशी निमित्त विठ्ठल आणि रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात आकर्षक सजावट करण्यात आली आहे.