ऋषभ पंतला डेहराडूनच्या सध्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये पुुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
उत्तरांचलच्या रुरकीच्या नरसन सीमेवर हम्मादपूरजवळ ऋषभ पंत यांचा अपघात झाला आहे. त्याची कार दुभाजकाला धडकल्याने हा अपघात झाला.
धुक्कामुळे रेलिंग न दिसल्याने कारचा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर कारला आग लागली. ही आग एव्हडी भीषण होती की आगीत कार जळल्याने पुर्ण गाडी खाक झाली.
या अपघातात पंतच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर कारने पेट घेतला आणि कार पूर्णपणे जळून खाक झाली. पंतची प्लास्टिक सर्जरी होणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 क्रिकेट संघात निवड न झाल्याने घरी परतत होता ऋषभ पंत मात्र वाटेत हा अपघात झाला. ऋषभ पंतसोबत झालेल्या कार अपघाताचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.
We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use. More Information.