Photo gallery : अमेरिकेत शिक्षण , भारताचे लष्कर प्रमुख अन नंतर भारताचे पहिले संरक्षण प्रमुख ; जाणून घ्या बिपीन रावत यांचा जीवनप्रवास

तामिळनाडूच्या कुन्नुरमध्ये आज दुपारी लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेत माजी लष्करप्रमुख आणि सीडीएस बिपीन रावत (Bipin Rawat) , त्यांच्या पत्नी मधुलिका यांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एकूण ११ जण मृत पावले आहेत.दरम्यान अपघात झाल्यांनतर सीडीएस बिपिन रावत हे जखमी असल्याचे सांगण्यात आले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.