रंग नव्या नात्यांचा, सोहळा कुटुंबाचा, कलर्स मराठी अवॉर्डची झलक

पुरस्कार सोहळ्यानिमित्ताने या सेलिब्रिटींचा स्टाईलिश अंदाज दिसून आला.  

  कलर्स मराठी पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला या सोहळ्यात कलावंतांची मांदीयाळी दिसून आली. या सोहळ्यात आपला बेस्ट परफॉर्मन्स देण्यासाठी सारेच तारे सज्ज होते आणि याची झलक कलावंतांच्या ग्लॅमरस अंदाजातून दिसून येत होतं कोणी महाराष्ट्रीयन साडीला पसंती दिली होती तर कोणी वेस्टर्न आऊटफिटला…या सा-यांची पहिली झलक आम्ही खास तुमच्यासाठी आणली आहे.

  या सोहळ्यात सेल्फीचा लकलकाट झाला…

  सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील कलाकार समीर परांजपे (अभिमन्यु), अक्षया नाईक(लतिका), संदेश उपशाम (सज्जन), आदिती द्रविड (कामिनी), उमेश दामले (बापू), गौरी किरण, हृषीकेश शेलार
  राजा रानीची गं जोडी मालिकेतील आपले लाडके कलाकार शुभांगी गोखले, मनिराज पवार (रणजीत) शिवानी सोनार (संजीवनी), श्रुति अत्रे (राजश्री) आणि मालिकेतील इतर कलाकारांनी हजेरी लावली…

  जय जय स्वामी समर्थ मालिकेचे अक्षय मुडावदकर(स्वामी समर्थ), विजया बाबर (चंदा), नित्या पवार- कृष्णप्पा आणि इतर कलाकार,बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील सुमित पुसावळे,
  बिग बॉस मराठी सिझन ३ चे आदिश वैद्य, सोनाली पाटील, तृप्ति देसाई, दादुस (संतोष चौधरी), मीरा जगन्नाथ, मीनल शहा, अक्षय वाघमारे, गायत्री दातार, स्नेहा वाघ तुझ्या रूपाचं चांदन मालिकेतील रोहित चंद्रा, तन्वी शेवाळे, सुरेखा कुडची, सुशांत शेलार , जीव माझा गुंतला मालिकेतील सौरभ चौघुले, योगिता चव्हाण, प्रतीक्षा मूणगेकर, पूर्वा शिंदे, सुमेधा दातार लेक माझी दुर्गा मालिकेतील हेमांगी कवी, सुशील ईनामदार , आई मायेचं कवच मालिकेतील भार्गवी चिरमूले, तेजस डोंगरे, अनुष्का पिंपुटकर सोन्याची पावलं मालिकेतील आदित्य दुर्वे, ज्योति निमसे, अवधूत गुप्ते आदी कलावंत हजर होते.

  स्मॉल स्क्रीनवर नेहमी त्यांच्या कॅरेक्टर्समध्ये दिसणारे या कलावंतांचे लूक पण या सोहळ्यानिमित्ताने या सेलिब्रिटींचा स्टाईलिश अंदाज दिसून आला.