प्रियांका चोप्राने इन्स्टा आणि ट्विटर अकाउंटवरुन जोनास आडनाव काढून टाकण्यावर सोडलं मौन; पाहा काय म्हणाली प्रियंका

  अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनासचे चाहते थक्क झाले होतो जेव्हा प्रियांकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या नावासमोरून ‘जोनास’ हटवले होते. ही बातमी येताच सोशल मीडियावर दोघांच्या घटस्फोटाची चर्चा जोरात आली होती. प्रियांका आणि निकच्या नात्याबद्दल अनेक तर्कवितर्क लावत जात असल्यामुळे अखेर प्रियांकाने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. जोनास आडनाव का हटवले यावर प्रियांकाने मौन सोडले आहे.

   

  या अफवांवर प्रतिक्रिया देताना प्रियंका म्हणाली की हा फक्त एक व्यावसायिक निर्णय आहे. एका मुलाखतीदरम्यान, ती म्हणाली की मी सोशल मीडियावर एखादा फोटो पोस्ट केले तरीही बोलण्यासाठी काही विषय शोधतील. आजकाल सोशल मीडियावर प्रत्येकाची उपस्थिती आहे, त्यामुळे गोष्टी वेगाने व्हायरल होऊ लागतात.

   

  प्रियांकाने पती निक जोनाससोबत कुटुंब सुरू करण्याबाबतही सांगितले. अभिनेत्रीने खुलासा केला की निकला मुलं हवी आहेत आणि देवाच्या कृपेने ते होईल तेव्हा होईल. प्रियांका पुढे सांगते की, जेव्हा आपल्या आयुष्यात एक मूल येईल तेव्हा आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून नक्कीच वेळ काढू. आम्ही दोघेही हे करण्यास तयार आहोत आणि आम्ही ते एकत्र करू.

   

  प्रियांका चोप्रा सध्या तिच्या आगामी ‘द मॅट्रिक्स रिसरेक्शन्स’ ‘The Matrix Resurrections’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. ‘द मॅट्रिक्स’ च्या चौथ्या भागात प्रियांका ‘सती’ची भूमिका साकारणार आहे.