वंडर्स पार्कचा होणार मेकओव्हर; रुपडं पालटण्याचा नवी मुंबई महापालिकेने केला निर्धार पहा PHOTOS

नवी मुंबई : महापालिकेने (NMMC) तयार केलेल्या नेरुळ (Nerul) येथील प्रसिद्ध वंडर्स पार्कला (Wonders Park) नवी झळाळी प्राप्त होणार आहे. नवी मुंबई महापालिकेने तब्बल २६ कोटी २४ लाख रुपये खर्च करून या उद्यानाचा काया पालट (Make Over) करण्याचे ठरवले आहे. अधिक आकर्षक स्वरूपात हे वंडर्स पार्क सजणार असून बच्चे कंपनीला आकर्षित करण्यासाठी नवे खेळ, राईड्स, म्युजिकल व कलरफुल कारंजे तसेच एस्सेल वर्ल्डच्या (Essel World) धर्तीवर नवे खेळ (New Games) देखील समाविष्ट करण्यात येणार आहे.

    येत्या काळात नव्या वंडर्स पार्कमधून एस्सेल वर्ल्डचा अनुभव नागरिकांना येणार आहे. नेरुळ विभागासोबतच नवी मुंबई विभागाची शोभा संपूर्ण एमएमआरमध्ये वाढणार आहे. दिवाळीपर्यंत वंडर्स पार्क खुले होण्याची शक्यता आहे.

     

    नवी मुंबईला उद्यनांचे शहर (Garderns City) म्हणून ओळखले जाते. नवी मुंबईत २०० पेक्षा अधिक सामान्य उद्याने आहेत.

     

    काही उद्याने ही मनोरंजनच्या दृष्टीने तयार केलेली आहेत. त्यात वंडर्स पार्कचा समावेश होतो.

     

    ज्वेल ऑफ नवी मुंबईसारखा उद्यान वजा विरंगुळ्यासाठी बनवलेला प्रकल्प असला तरी; वंडर्स पार्क हे सर्वच बाबतीत मनोरंजनाच्या दृष्ट्या उजवे ठरत आहे.

     

    लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वचजण या उद्यानात समरस होऊन गेलेले पाहण्यास मिळतात. महापालिकेने नेरूळ सेक्टर १९ ए येथे फेब्रुवारी २०१० मध्ये ३७ कोटी रुपये खर्च करून वंडर्स पार्क उद्यान उभारले.

     

    उद्यानाचे लोकार्पण डिसेंबर २०१२ मध्ये करण्यात आले. जगातील सात आश्चर्ये, विविध खेळणी, राईड्स लहान मुलांसाठी ट्रेन, तलाव, हिरवळ अशा विविध बाबी उभरल्याने अल्पावधीय हे उद्यान नवी मुंबई करांच्या पसंतीस उतरले.

     

    खेळण्यासोबत परसलेली हिरवळ देखील नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरत आहे. नागरिकांच्याच मुखातून या उद्यानास प्रसिद्धी मिळाल्याने पनवेल, उरण, ठाणे, मुंब्रा व मुंबईतून नागरिक येथे येऊ लागले. त्यामुळे नवी मुंबईतील सर्वाधिक प्रसिद्ध ठिकाण म्हणून वंडर्स पार्कचे नाव अल्पवधीत प्रसिद्ध झाले. (सर्व फोटो : सिद्धेश प्रधान)