‘फतवा’ (Fatwa) हा चित्रपट ९ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्यानिमित्ताने या चित्रपटाचा लेखक, दिग्दर्शक आणि मुख्य नायक प्रतिक गौतम (Pratik Gautam), अभिनेत्री श्रद्धा भगत (Shraddha Bhagat) आणि अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) यांनी नवराष्ट्रच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी या तिघांनी दिलखुलास गप्पांमध्ये चित्रपटाच्या अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे.