अक्षय कुमारचा (Akshay Kumar)  बहुप्रतीक्षित सिनेमा ‘पृथ्वीराज’चा (Prithviraj) एक नवा ट्रेलर (Prithviraj Hindustan Ka Sher)आज रिलीज करण्यात आला आहे. हा ट्रेलर (Prthviraj Trailer)  बघितल्यानंतर लोकांच्या मनात या चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे. राजा पृथ्वीराज चौहानच्या भूमिकेत अक्षय कुमार शोभून दिसत आहेत. ट्रेलरमध्ये त्याची अभिनेत्री मानुषी छिल्लरसोबतची (Manushi Chillar) केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित हा चित्रपट ३ जूनला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर यशराज फिल्म्सच्या युट्यूब चॅनलवर रिलीज करण्यात आला आहे. आत्तापर्यंत या ट्रेलरला ४ लाखाहून जास्त लोकांनी बघितले आहे.