प्रियांका चोप्रानं केलं इंटरनॅशनल मॅगझिनसाठी खास फोटोशूट, ग्लॅमरस दिसतेय PC

प्रियांका चोप्राने हे फोटोशूट व्हॅनिटी फेअर मॅगझिनच्या फेब्रुवारी 2022 च्या कव्हर पेजसाठी केले आहे.

  बॉलिवूडसोबतच हॅालिवूडमध्ये आपल्या अभिनयाने नाव कमावणाऱ्या अभिनेत्री प्रियंका चोप्राने नुकतेच एक फोटोशट केले आहे. प्रियांकाने एका इंटरनॅशनल मॅगझिनसाठी हे फोटोशूट केले आहे. आणि फॅन्सची या फोटोंना चांगलीच पसंती मिळत आहे.

  ग्लॅमरस स्टाईलसाठी लोकप्रिय असलेल्या बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा कॅमेऱ्यासाठी विविध पोज देताना दिसत आहे.

   

  प्रियांका चोप्राने हे फोटोशूट व्हॅनिटी फेअर मॅगझिनच्या फेब्रुवारी 2022 च्या कव्हर पेजसाठी केले आहे.

   

  ऑफ-शोल्डर सेमी-शीअर लाल ड्रेसमध्ये प्रियांका चोप्रा सेक्सी दिसत आहे

   

  ब्लॅक अँड व्हाईट लुकमधल्या या फोटोत प्रियंका स्टनिंग दिसत आहे.