‘पुष्पा इम्पॉसिबल’ (Pushpa Impossible) नावाच्या सोनी सबच्या (Sony Sub) मालिकेमध्ये सध्या एका आईचा शिक्षणाचा प्रवास दाखवला जात आहे. त्यानिमित्ताने नवराष्ट्र प्रतिनिधीने मालिकेचे निर्माता जे.डी. मजिठीया (J. D. Majithia Interview) यांच्याशी संवाद साधला. जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, असा संदेश देणारी ही मालिका असल्याचं मत ‘पुष्पा इम्पॉसिबल’मालिकेचे निर्माता जे. डी. मजिठीया यांनी यावेळी व्यक्त केलं.