महाराणी एलिझाबेथ यांच्यावर पार पडले अंत्यसंस्कार, विंडसर कॅसल येथे देण्यात आला अखेरचा निरोप

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांच्यावर काल (19 सप्टेंबर 2022) रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले.

   

  ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी आज विंडसर येथे अंत्यसंस्कार पार पडले.
  राणी एलिझाबेथ यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी आठ सप्टेंबरला निधन झाले.
  लंडनमध्ये वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये चार दिवस त्यांचं पार्थिव अंत्यदर्शानासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी नागरिकांनी कित्येक तास रांगेत उभे राहून एलिझाबेथ यांना श्रद्धांजली वाहिली.

   

  यावेळी त्यांचे पुत्र राजे चार्ल्स तिसरे, राणी कॅमिला, राजघराण्यातील इतर सदस्य उपस्थित होते.

   

  भव्य आणि प्राचीन अशा वेस्टमिन्स्टर ॲबेमध्ये प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते.