मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray In Nagpur) सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekar Bawankule) यांची सदिच्छा भेट घेतली. बावनकुळे यांनी राज ठाकरेंना गणपतीची मूर्ती भेट म्हणून दिली. या दोघांमध्ये यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली.