नागपूर : अद्वैत नावाच्या मुलाने हट्ट केला की राज ठाकरे यांना भेटल्याशिवाय आज जेवणार नाही. त्यामुळे अद्वैत आणि त्याची आजी सकाळपासूनच नागपूरमध्ये (Nagpur) राज ठाकरे (Raj Thackeray) ज्या हॉटेलमध्ये येणार होते तिथे येऊन थांबले. राज ठाकरे हॉटेलला आल्यावर आजीने अद्वैतच्या हट्टाबाबत मनसे (MNS) कार्यकर्त्यांना सांगितलं. कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना ही गोष्ट सांगितली. त्यानंतर राज ठाकरे यांनी मुलासाठी निरोप पाठविला की अद्वैत जेवल्याशिवाय राज ठाकरे त्याला भेटणार नाहीत. अद्वैत त्यानंतर जेवला आणि त्यानंतर राज ठाकरेंना भेटला. राज ठाकरेंनी या मुलाला आनंदाने स्वाक्षरी दिली.