rakhi collage

यावर्षी ११ ऑगस्टला रक्षाबंधन (Raksha Bandhan 2022) आहे. आपल्या भावाला वेगळ्या प्रकारची राखी (Diffrent Types Of Rakhi) बांधावी , असं प्रत्येक बहीणीला वाटत असतं. त्यासाठी बाजारात कोणकोणत्या राख्या आल्या आहेत हे आपण बघत असतो. रुद्राक्ष राखी, गोल्डन राखी, मोत्याची राखी अशा अनेक राख्यांबरोबर यंदा पुष्पा राखीची (Pushpa Rakhi) क्रेझ दिसून येत आहे. पाहा राख्यांचे हे खास फोटो.

  rudraksha-rakhi

  रुद्राक्ष राखी खूप आधीपासून ट्रेंडमध्ये आहे. अनेकांना ही राखी आवडते.

  golden-rakhi

  सोन्याचे दागिने घालणं अनेकांना आवडतं. मात्र काहीजण सोन्याची राखी बांधणेही पसंत करतात.

  evil-eye-rakhi

  एव्हिल आय तुमचं वाईट गोष्टीपासून रक्षण करण्यासाठी उपयोगी आहे. त्यामुळे एव्हिल आय राखीदेखील आजकाल मोठ्या प्रमाणात वापरली जाते.

  turtle-rakhi

  कासवाच्या आकाराच्या अंगठ्या घालणारे अनेकजण तुम्ही बघितले असतील. मात्र कासवाच्या आकाराची राखी म्हणजेच टर्टल राखी बाजारामध्ये उपलब्ध आहे.

  pearl-rakhi

  मोत्यांचे दागिने तर सगळ्यांनाच आवडतात मात्र मोत्याची राखीसुद्धा तितकीच छान दिसते.

  pushpa rakhi2

  पुष्पा चित्रपट खूप गाजला होता. पुष्पाच्या फॅन्सना आवडेल अशी पुष्पा राखी सध्या लोकांचं लक्ष वेधून घेत आहे.

  pushpa rakhi

  पुष्पा राखीवर पुष्पा चित्रपटातील संवादही पाहायला मिळत आहेत.