रिंकू राजगुरूच्या साडीतील दिल खेचक अदा

    अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) म्हणजेच सैराट फेम आर्ची ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

    तिचे रोजचे आयुष्य, नवीन फोटोशूट अशा अनेक गोष्टी ती  सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी पोस्ट करत असते. यावेळी तिने नुकतेच पोस्ट केलेल्या साडीतील फोटोंवर तिचे चाहते अक्षरशः घायाळ झाले आहेत.

    रिंकू राजगुरू हिने नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्या ‘सैराट’ (Sairat) चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

    त्यानंतर अनेक मराठी चित्रपटांमध्ये तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. रिंकू राजगुरूला खऱ्या आयुष्यात साडी नेसायला फार आवडते, असे तिने एका मुलाखतीत म्हंटले होते. अनेकदा लहान असताना ती तिच्या आईच्या साड्या कौतुकाने नेसायची असे देखील तिने सांगितले.