सोनी लिव्ह (Sony Liv) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘रॉकेट बॉईज’ (Rocket Boys) नावाची वेबसीरिज काही दिवसांपूर्वी रिलीज झाली होती. ही वेबसीरिज  वैज्ञानिक होमी भाभा (Homi Bhaba) आणि विक्रम साराभाई (Vikram Sarabhai)  यांच्यावर जीवनावर आधारित आहे. या दोन्ही वैज्ञानिकांचं इस्रो आणि वैज्ञानिक क्षेत्रातलं योगदान आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील खासगी घडामोडी या वेबसीरिजमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. नुकताच या सीरिजच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर (Rocket Boys 2 Trailer) प्रदर्शित झाला आहे. टीझरवरून हा नवा सीझन पोखरण अणू चाचणीवर आधारित असल्याचे जाणवत आहे. होमी भाभा यांची भूमिका साकारणारा जीम सार्भ आणि विक्रम सारभाई यांची भूमिका साकारणारा इश्वाक यांची झलकही या टीझरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. याबरोबरच इंदिरा गांधी आणि ए.पी.जे अब्दुल कलाम यांची झलकही आपल्याला दिसते. ‘रॉकेट बॉईज’चा दुसरा सीझन या वर्षाअखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.