बॉस्को लेस्ली मार्टिस दिग्दर्शित ‘रॉकेट गँग’(Rocket Gang) चं पहिलं गाणं ‘दुनिया है मां की गोदी में’(Duniya Hai Maa Ki Godi Mein) आज रिलीज झालं आहे. ‘दुनिया है मां की गोदी में’ या गाण्याच्या शीर्षकावरून समजतं की हे गाणं एक आई आणि मुलाचं भावनिक नातं दर्शवणार आहे. अमित त्रिवेदीनी कंपोज केलेलं हे गाणं राशि हरमलकर, अरहान हुसेन आणि अल्तमश फरीदी यांनी गायलं आहे. क्षितिज पटवर्धनने हे गाणं लिहिलं आहे.