अभिनेत्री अमृता सुभाष (Amruta  Subhash) नेहमीच वेगळ्या आणि उत्तम भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. अमृता आता ‘सास बहू अचार प्रायव्हेट लिमिटेड’ (Saas Bahu Achaar Pvt. Ltd.) नावाच्या एका नव्या सीरिजमध्ये दिसणार आहे ज्याचा ट्रेलर (Saas Bahu Achaar Pvt. Ltd.Trailer ) प्रदर्शित झाला आहे. अमृता जुलै महिन्यात या आगळ्या वेगळ्या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही सीरिज झी 5 (Zee 5) वर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये अमृता सुमन हे पात्र साकारत आहे. अमृताची भूमिका ही एका हाऊसवाईफची असून स्वतःच्या बळावर स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सुमन लोणच्याचा बिजनेस सुरु करते असं या ट्रेलरमधून कळत आहे. अमृताची भूमिका कायमच स्त्रीचं कणखर आणि खंबीर रूप आपल्याला दाखवत आली आहे. असंच एक हळवं आणि गोड पात्र सुमनचंही आहे.