समायरा (Samaira) म्हणजे प्रोटेक्टेड बाय गॉड. स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात निघालेली 'समायरा' आणि तिचा अनन्यसाधारण प्रवास खूप काही शिकवून जाणार यात काही शंकाच नाही. नुकताच ‘समायरा’चा ट्रेलर (Samaira Trailer) प्रदर्शित झाला आहे. समायराच्या प्रवासात तिला जिवाभावाचा साथीदारही भेटला. आई-वडिलांच्या शोधात निघालेली ‘समायरा’कशी स्वतःच स्वतःला उलगडतेय आणि तिच्या आयुष्याचे काही काळाच्या आड दडून राहिलेले रहस्य कसे हळूहळू समोर येतेय, हे या ट्रेलरमधून समोर येत आहे. आजच्या नव्या पिढीला अध्यात्माचे महत्व हा चित्रपट पटवून देईल, असे ट्रेलर पाहून वाटत आहे. यात ‘समायरा’ची भूमिका केतकी नारायण साकारत असून अंकुर राठी, सतीश पुळेकर आणि रोहित कोकाटे निर्णायक भूमिकेत आहेत. 'समायरा’ चित्रपट येत्या २६ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.