गेल्या वर्षी ‘सरसेनापती हंबीरराव’ (Sarsenapati Hambirrao) या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांना ट्रेलरची प्रतीक्षा होती. आता या ऐतिहासिक चित्रपटाचा ट्रेलर छत्रपती संभाजी महाराज जयंती दिनी (Sarsenapati Hambirrao Trailer) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे (Pravin Tarde) हे ‘सरसेनापती हंबीरराव’ यांची भूमिका साकारत आहेत. येत्या २७ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठीतील बिग बजेट सिनेमा असे या चित्रपटाच्या बाबतीत म्हटले जात आहे. ट्रेलरमध्ये प्रवीण तरडे, गश्मीर महाजनी (Gashmir Mahajani) यांचा लूक लक्ष वेधून घेणार आहे.