सोनी लिव्हवरील (Sony Liv) ‘शांतीत क्रांती’(Shantit Kranti) वेबसीरिजचा दुसरा सीझन 13 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर (Shantit Kranti 2 Trailer) नुकताच रिलीज झाला आहे. तब्बल 18 महिन्यांनंतर एकत्र येत श्रेयस (अभय महाजन) सर्व मुलांना विवाह करत असल्याची आनंदाची बातमी देतो आणि तिन्ही मुले श्रेयसच्या इंटरनॅशनल बॅचलर ट्रिपवर जाण्याचे ठरवतात. श्रेयसचा साखरपुडा झालेला नाही, प्रसन्नने (ललित प्रभाकर) त्याच्या बाळाला सोबत आणले आहे आणि दिनारने (अलोक राजवडे) बॅचलरच्या ट्रिपऐवजी 10 अनोळखी व्यक्तींसह नेपाळला 6 दिवसांच्या तीर्थयात्रेवर जाण्यासाठी बस बुक केली आहे हे समजल्यानंतर स्थिती वेगळे वळण घेते. भडिपासह सहयोगाने टीव्हीएफची निर्मिती आणि अरूनभ कुमारद्वारे निर्मित शोचे दिग्दर्शन सारंग साठ्ये व पौला मॅकग्लीन यांनी केले आहे. या सीरिजमध्ये अभय महाजन, आलोक राजवडे, ललित प्रभाकर, मृण्मयी गोडबोले, प्रिया बॅनर्जी, प्रियदर्शिनी इंदलकर हे स्टार कलाकार आहेत.

Animal Song Jamal Kudu Out'अॅनिमल'मधील 'जमाल कुडू' हे गाणे रिलीज, धमाला मस्ती करताना दिसत आहे बॉबी देओल!
1/5

Mahaparinirvaan First Look 'महापरिनिर्वाण' दिनानिमित्ताने ‘महापरिनिर्वाण’चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला
2/5

The Archies Premier 'द आर्चीज'च्या प्रीमियरला सिनेसृष्टीचं अवतरली, शाहरुख खाननं लेकीला केलं सपोर्ट ; अगस्त्यासाठी बच्चन कुटुंबियाचीही हजेरी!
3/5
