अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्राचा बहुप्रतीक्षित सिनेमा ‘सुखी’चा(Sukhee) ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. मोठ्या ब्रेकनंतर शिल्पा (Shilpa Shetty) पुन्हा चित्रपटात दिसणार आहे. (Sukhee Trailer) ट्रेलर पाहूून अंदाज येतो की, एका सामान्य गृहिणीच्या बिनधास्त भरारीची कथा या सिनेमात मांडण्यात आली आहे. सुखप्रीत कालरा उर्फ सुखी ही एक 38 वर्षांची पंजाबी गृहिणी आहे. शिल्पा शेट्टी या सुखीची भूमिका साकारतेय. सुखी शाळेच्या रियुनियनसाठी जाते आणि तिला तिचं लहानपणीचं रुप गवसतं. तिचं बाईपण किती भारी आहे याची जाणीव तिला होते. आता या प्रवासात तिच्या सोबतीला कोण कोण कसे कसे उभे राहतात, हे चित्रपट बघितल्यानंतर कळेल. हा चित्रपट 22 सप्टेंबर 2023 ला रिलीज होतोय. चित्रपटात शिल्पासोबत कुशा कपिला, अमित साध, पवलीन गुजराल, दिलनाज इरानी, चैतन्य चौधरी, ज्योती कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. सोनल जोशीने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.