कल्याणच्या मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी कशी झाली महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतील कॅामेडी क्विन, जाणून घ्या शिवाली परबचा प्रवास

अभिनेत्री शिवाली परब आज तिचा 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसानिमीत्त तिच्या मनोरंजन सृष्टीतील करिअर विषयी जाणून ध्या

  मूळची कल्याणची असलेल्या शिवाली दीपक परबचा जन्म 10 मे 1995 मध्ये सावतंवाडी येथे झाला. लहानपणापासूच तिला कला क्षेत्राची आवड होती. तिने मालिका, चित्रपट, नाटकांमधून तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

   

  महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमानं तिला घराघरात ओळख मिळवून दिली. या शोमधील तिच्या अभिनयाचं फार कौतुक झालं.

   

  महाराष्ट्राची हस्यजत्रा शो व्यतिरिक्त व्हॉट्सॲप लव्ह, प्रेम प्रथम धुमशान या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं. शिवाय शिवालीने मराठी वेब सिरीज बॅक बेंचर्समध्ये काम केलं आहे.

   

  शिवाली सोशल मिडीयावर फार सक्रीय असते. ती नेहमी तिच्या व्यवसायिक तसेच वैयक्तिक आयुष्याबद्दलचेही अपडेट चाहत्यांसोत शेअर करत असते.

   

  मध्यंतरी शिवाली आणि अभिनेता निमिष कुलकर्णीच्या रिलेशनशीपच्या चर्चा रंगल्या होत्या.

   

  शिवालीने उत्तम अभिनयकौशल्याच्या जोरावर मराठी कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.