गणेशोत्सवाच्या काळामध्ये विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी (Dolby In Ganeshotsav) वाजवण्याची परवानगी द्या, अशी मागणी आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinghraje Bhosale) यांनी राज्य सरकारकडे केली आहे. ते साताऱ्यात बोलत होते. डॉल्बीसंदर्भात बोलण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.