शुभम प्रोडक्शन प्रस्तुत, गणेश दिनकर कदम दिग्दर्शित ‘शॉर्ट अँड स्वीट’(Short And Sweet) या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. एक कौटुंबिक कथा असलेल्या ‘शॉर्ट अँड स्वीट’  (Short And Sweet Teaser) या चित्रपटात सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni), हर्षद अतकरी (Harshad Atkari), श्रीधर वाटसर, रसिका सुनील या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या टीझरमध्ये दिसतंय की, इतक्या वर्षांनी घरी परतलेला संजू त्याच्या बाबांना भेटण्यासाठी उत्सुक असतानाच, त्यांना भेटल्यावर तो नाराज होतो. कोण आहेत संजूचे बाबा? नेमके काय कारण असेल ज्यामुळे संजूच्या आईने त्याच्यापासून ही गोष्ट लपवली, हे पाहण्यासाठी सर्व प्रेक्षक उत्सुक आहेत. येत्या 3 नोव्हेंबरला चित्रपट रिलीज झाल्यावरच संजूच्या बाबांचं गुपित उलगडणार आहे.