हॉलिवूड चित्रपट ‘स्पायडर मॅन अक्रॉस द स्पायडर व्हर्स’ (Spider Man Across The Spider Verse) चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या कार्टून फिल्मला भारतात मोठ्या प्रमाणावर रिलीज केलं जाणार आहे. तब्बल 10 भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रिकेट जगतात आपल्या बॅटींगचा करिश्मा दाखवणारे शुभमन गिल(Shubhman Gill) यांचा या चित्रपटात मोलाचा वाटा आहे. शुभमन गिल यांनी चित्रपटाच्या हिंदी आणि पंजाबी भाषेत या चित्रपटासाठी आवाज दिला आहे. ‘स्पायडर मॅन अक्रॉस द स्पायडर व्हर्स’((Spider Man Across The Spider Verse Traler Launch) चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमातही त्यांची उपस्थिती होती. हिंदी, इंग्लिश आणि पंजाबीशिवाय तामीळ, तेलुगू, गुजराती, मराठी, बंगाली, कन्नड आणि मल्याळम भाषेत हा चित्रपट येत्या 1 जुनला रिलीज होणार आहे.