‘श्यामची आई’ (Shyamchi Aai) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये साने गुरुजी (Sane Guruji) यांच्या बालपणीच्या आठवणी तसेच त्यांच्या आईची शिकवण आणि त्यांचा स्वातंत्र्य लढा या अशा सगळ्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत.  साने गुरुजी यांच्या कादंबरीवर आधारित ‘श्यामची आई’ या चित्रपटाची संहिता प्रसिद्ध लेखक -दिग्दर्शक सुनील सुकथनकर (Sunil Sukthankar) यांची आहे.‘श्यामची आई’ या चित्रपटाचा ट्रेलर (Shyamchi Aai Trailer) ब्लॅक अँड व्हाईटमध्ये रिलीज करण्यात आला आहे.  या चित्रपटाची निर्मिती अमृता अरुण राव यांची आहे. हा चित्रपट 10 नोव्हेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेता ओम भूतकर, गौरी देशपांडे, बाल कलाकार शर्व गाडगीळ,संदीप पाठक, ज्योती चांदेकर, सारंग साठ्ये,उर्मिला जगताप,अक्षया गुरव, दिशा काटकर,मयूर मोरे,गंधार जोशी , अनिकेत सागवेकर या कलाकारांनी देखील महत्वाची भूमिका साकारली आहे.