बिग बॉस 13 (Bigg Boss 13) चा विजेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Siddharth Shukla) निधनामुळे चाहत्यांना खूप दु:ख झाले होते. आता सिद्धार्थ शुक्लाचं शेवटचं गाणं ‘जिना जरुरी हैं’ (Jeena Zaroori Hai) रिलीज झालं आहे. या गाण्यात लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे. ‘जिना जरुरी हैं’ या गाण्यात सिद्धार्थ शुक्ला आणि दीपिका त्रिपाठी (Deepika Tripathi) दिसत आहेत. तसेच विशाल कोटियानदेखील (Vishal Kotian) आहे. विशाल कोटियान गाण्यात सिद्धार्थच्या भावाची भूमिका करत आहे. ‘जिना जरुरी है’ गाणं पाहून सिद्धार्थचे चाहते त्याच्या आठवणीत रमले आहेत.