‘जे व्हायचे ते होईल…’, श्रेयस तळपदे आणि विजय राज यांच्या ‘कर्तम भुगतम’चा दमदार टीझर रिलीज!

श्रेयस तळपदे आणि विजय राज यांचा आगामी सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट 'कर्तम भुगतम'चा दमदार टीझर रिलीज झाला आहे. हा चित्रपट तुम्हाला कर्म आणि नियतीच्या एका रोमांचक प्रवासात घेऊन जाईल. या चित्रपटात मानसशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रातील रहस्य उलगडताना पाहायला मिळणार आहे.