सोनाली कुलकर्णीचे (Sonalee Kulkarni Marriage) लग्न कसे झाले, हे जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना होती. चाहत्यांची ही इच्छा 'प्लॅनेट मराठी' (Planet Marathi OTT) ओटीटी पूर्ण करत आहे. लोकांना आता सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) आणि कुणाल बेनोडकरच्या Kunal Benodkar) आयुष्यातील या अविस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार होता येणार आहे. हा लग्नसोहळा प्लॅनेट मराठीवर काही भागांमध्ये ११ ऑगस्टला पाहायला मिळणार आहे. एखाद्या मराठी अभिनेत्रीचा लग्नसोहळा वेबविश्वात प्रसारित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या लग्नसोहळ्याची झलक (Sonalee Kulkarni Wedding Trailer) चाहत्यांच्या भेटीला आली आहे.