प्रेमाची व्याख्या सांगणारा महेश डोंगरे दिग्दर्शित ‘समरेणू’ (Samrenu) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत्या १३ मे रोजी येत आहे. काही दिवसांपूर्वी ‘समरेणू’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता ‘समरेणू’ चित्रपटातील ‘सोसना वेटिंग’ (Sosana Waiting Song) हे गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. या गाण्याला आदर्श शिंदे यांचा दमदार आवाज लाभला आहे. गुरू ठाकुर (Guru Thakur) यांनी शब्दबद्ध केलेल्या गाण्याला सुरज- धीरज यांचे संगीत दिले आहे. ‘समरेणू’ ची निर्मिती एमआर फिल्म्स वर्ल्डची असून प्रमोद कवडे, बाळासाहेब बोरकर, बालाजी मोरे, युवराज शेलार सहनिर्माता आहेत. या चित्रपटात महेश डोंगरे, रूचिता मांगडे, भरत लिमण यांच्या प्रमुख भूमिका आहेत.