दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांच्या ‘सुभेदार’(Subhedar) या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून येत्या 18 ऑगस्ट रोजी ‘सुभेदार’ चित्रपटगृहामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अंगावर काटा आणणारा ‘सुभेदार’ चित्रपटाचा ट्रेलर(Subhedar Trailer) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दिग्पाल यांच्या शिवराज अष्टकातील हा पाचवा सिनेमा आहे. आधी लगीन कोंढाण्याचं मग आमच्या रायबाचं म्हणत मुलाचं लग्न सोडून कोंढाणा गडाच्या मोहिमेवर जाणाऱ्या तान्हाजी मालुसरेंची कथा या सिनेमात बघायला मिळणार आहे. या सिनेमात ‘सुभेदार’ तान्हाजी मालुसरे यांच्या भूमिकेत अभिनेते अजय पुरकर (Ajay Purkar) दिसणार आहेत.