सुप्रिया सुळेंच्या साड्यांचं कलेक्शन आहे भारी, हँडलूमवर दिसते विशेष प्रेम

सुप्रिया सुळे या राजकारणात मागील कित्येक वर्षांपासून सक्रिय आहेत. सुप्रिया सुळे त्यांच्या सध्या राहणीमानामुळे नेहमीच चर्चेत असते. त्यांनी आत्तापर्यंत नेसलेल्या प्रत्येक साडीचे खास वैशिष्ट्य आहे.

  सुप्रिया सुळे या राजकारणात मागील कित्येक वर्षांपासून सक्रिय आहेत. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये बारामती लोकसभा मतदार संघात प्रतिनिधित्व करत १७ व्या लोकसभेतील खासदार आहेत. बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार आहे. सुप्रिया सुळे त्यांच्या सध्या राहणीमानामुळे नेहमीच चर्चेत असते. त्यांनी आत्तापर्यंत नेसलेल्या प्रत्येक साडीचे खास वैशिष्ट्य आहे. वडील शरद पवार यांच्यासोबत त्या नेहमीच राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावतात. त्यावेळी त्यांनी नेसलेल्या साड्यांचे विशेष कौतुक देखील केले जाते. सुप्रिया सुळे यांनी नेसलेल्या साड्यांमध्ये अत्यंत क्लासी रॉयल दिसून येतो.

  ग्रीन प्युअर बनारसी कोटा कॉटन साडी

  सुप्रिया सुळे यांनी नेसलेली साडी अत्यंत साधी असली तरी तिचा लुक रॉयल आहे. या साडीचे नाव ग्रीन प्युअर बनारसी कोटा कॉटन साडी असून या साडीचे कापड कॉटन मध्ये असल्याने साडी नेसल्यानंतर नीटनेटकी बसते. ही साडी नेसायला सुद्धा हलकी आहे.या साडीवर सिल्वर दोऱ्यांचा वापर करून हातमागावर कॉटन साडी तयार केली जाते.

  बनारसी पटोला सिल्क साडी

  बनारसी पटोला सिल्क साडीवर खास आकर्षक रंगांची प्रिंट बनवण्यात आली आहे. लाल आणि निळ्या रंगाचे परफेक्ट कॉम्बिनेशन असलेली ही साडी सर्व महिलांच्या वॉर्डरोबमध्ये नक्कीच असायला हवी.

  आसामी साडी

  आसाम सिल्क साडी ही तिच्या सुंदरतेमुळे भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात अतिशय लोकप्रिय आहेत. आसाम राज्यामध्ये उच्च दर्जाच्या रेशीम उत्पादनासाठी प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. सुप्रिया सुळेंनी नेसलेल्या गुलाबी रंगाच्या साडीवर सफेद रंगाच्या बुट्ट्या दिसून येत आहेत. साडीला मॅचिंग असा साधा ब्लाऊज त्यांनी स्टाईल केला आहे.

  उप्पाडा जामदानी साडी

  उप्पाडा जामदानी साडी ही भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील उपाडा येथे विणलेली एक रेशमी साडी शैली आहे. ही साडी तिच्या हलक्या वजनामुळे ओळखली जाते. सुप्रिया सुळेंनी नेसलेल्या साडीमध्ये फूलदाणी असल्याचे दिसून येत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात अशा स्टाईलच्या साड्या अधिक आकर्षक दिसून येतात.