प्रेमाची अनोखी भाषा सांगणारे ‘पौर्णिमेचा शुभ्र चंद्र’ (Pornimecha Shubhra Chandra Song) हे प्रेम गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. एखाद्या चित्रामधील लावण्यवती प्रत्यक्षात अवतरते तेव्हा नेमके काय घडते याचे चित्रण ‘पौर्णिमेचा शुभ्र चंद्र’ या गाण्यात करण्यात आले आहे. सुनीता मुलकलवार लिखित या गीताला अभिजित जोशी यांनी संगीत दिले आहे. गायक सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांचा स्वरसाज या गीताला लाभला आहे. या गीताचे दिग्दर्शन दुर्गेश हरावडे तर, नृत्यदिग्दर्शन मीरा जोशी आणि तुषार बल्लाळ यांनी केले आहे. या सुमधुर गीताचे छायाचित्रण किआन चव्हाण यांनी केले आहे. रुचिरा जाधव व आदित्य दुर्वे या दोघांवर हे गाणे चित्रित केले आहे. केदार जोशी आणि पूर्वा जोशी यांच्या सुमन एंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेअंतर्गत चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यात एखादा कलाकार त्याच्या कलाकृतीशी एकरूप होतो आणि त्यानंतर घडलेल्या घटना या उत्तमरित्या मांडण्यात आल्या आहेत. (New Marathi Song)