काही दिवसांपूर्वीच ‘हरिओम’ (Hari Om) चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले. तेव्हापासूनच या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढू लागली. ‘हरिओम’मधील (Song From Hari Om Movie) एक प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘सुरु झाले पर्व नवे’ (Suru Jhale Parv Nave) असे या गाण्याचे बोल असून या गाण्याला रोहित राऊत (Rohit Raut) आणि जुईली जोगळेकर (Juilee Joglekar) यांच्या सुरेल आवाजाची जोड लाभली आहे. अमोल कोरडे यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला निरंजन पेडगावकर यांनी संगीतबद्ध केले आहे. तर या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन स्वरूप मेदरा यांनी केले आहे.या चित्रपटात हरी आणि ओम या दोन मावळ्यांचा रांगडा अवतार तर पाहायला मिळणारच आहे याशिवाय देशप्रेमाने झपाटलेल्या या दोन बंधू मावळ्यांची हळुवार फुलत जाणारी प्रेमकथाही पाहायला मिळणार आहे. श्रीहरी स्टुडीओज प्रस्तुत, हरिओम घाडगे निर्मित, आशिष नेवाळकर आणि मनोज येरुणकर दिग्दर्शित ‘हरिओम’ चित्रपट येत्या १४ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.