ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे(Sushma Andhare) सध्या अंबेजोगाई आणि परळीच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान माध्यमांशी साधलेल्या संवादात राज्य सरकारच्या धोरणावर त्यांनी टीका केली. राज्य सरकारने नुकतेच महिलांसाठी एसटीच्या प्रवासात 50 टक्के सूट दिली. मात्र एसटी प्रवासात सूट देण्यापेक्षा बाराशे रुपयांचा सिलेंडर महिलांना चारशे रुपयाला उपलब्ध करून द्यावा, असं मत अंधारे यांनी व्यक्त केलं.