श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरिजी महाराज डोंबिवलीत आले असताना त्यांनी राम मंदिराच्या बांधकामाची सद्यथिती सांगितली. जानेवारी 2024 च्या तिसऱ्या आठवड्यात भगवान राम लल्लांची स्थापना निश्चितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करणार, असं ते म्हणाले. मंदिराचे काम वेगाने सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.