अभिनेत्री तारा सुतारियाच्या (Tara Sutaria) ‘अपूर्वा’(Apurva) चित्रपटाबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ‘अपूर्वा’ या चित्रपटात अभिषेक बॅनर्जी खलनायकाच्या रुपात दिसणार आहेत. राजपाल यादवदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. अपूर्वाचं अपहरण आणि तिचा गुंडांसोबतचा लढा अशी काहीशी चित्रपटाची कथा असल्याचा अंदाज ट्रेलरवरून (Apurva Trailer) येतो. हा चित्रपट 15 नोव्हेंबरला Disney Plus Hotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.