ईव्हीच्या बाजारात आता होणार आहे राडा कारण धिंगाणा करायला लवकरच येतेय टाटांची Tiago EV

मुंबई : टाटा मोटर्स (Tata Motors) या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोबाइल उत्‍पादक व ईव्‍ही क्रांतीमधील अग्रणी कंपनीने आज त्‍यांच्‍या ईव्‍ही फॅमिलीमधील नवीन सदस्‍य – टियागो.ईव्‍हीच्‍या लाँचची (Tiago EV Launch) घोषणा केली. भारताला भावी गतीशीलतेकडे घेऊन जात टियागो.ईव्‍ही आकर्षक, प्रभावी, पर्यावरणास अनुकूल व प्रिमिअम ईव्‍ही ड्राइव्‍ह अनुभवासह देशतील नागरिकांचे लक्ष वेधून घेण्‍यास सज्‍ज झाली आहे.

    पहिल्‍या १०,००० ग्राहकांसाठी (ज्‍यापैकी २००० नेक्‍सॉन ईव्‍ही व टिगोर ईव्‍हीच्‍या विद्यमान मालकांसाठी राखीव ठेवण्‍यात येतील) 8.49 Lakh रूपयांच्‍या विशेष सुरूवातीच्‍या किंमतीपासून टियागो.ईव्‍हीसाठी बुकिंग्‍जना १० ऑक्‍टोबर २०२२ रोजी सुरूवात होईल.

     

    ग्राहक कोणत्याही अधिकृत टाटा मोटर्स डिलरशिपकडे किंवा वेबसाइटवर २१,००० रूपये बुकिंग रक्‍कम भरून त्‍यांची कार रिझर्व्‍ह करू शकतात. जानेवारी २०२३ पासून डिलिव्‍हरींना सुरूवात होईल.