देशाला आज मिळाली स्वदेशी बनावटीची तिसरी हायस्पीड वंदे भारत एक्सप्रेस!

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. मोदी यांनी आज गांधीनगर ते मुंबई सेंट्रल या वंदे भारत एक्स्प्रेसला गांधीनगर स्थानकावर हिरवा झेंडा दाखवला. तसेच त्यांनी गांधीनगर ते कालुपूर या नव्या ट्रेनमधूनही प्रवासही केला.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गांधीनगर आणि मुंबई सेंट्रल दरम्यान धावणाऱ्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.

   

  यावेळी राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश उपस्थित होते.
  गुजरातमध्ये धावणाऱ्या या वंदे भारत ट्रेनमध्ये प्रथमच कवच (ट्रेन कोलिजन अवॉयडन्स सिस्टिम) तंत्रज्ञान सुरू करण्यात येत आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने दोन गाड्यांची समोरासमोर धडक होण्यासारखे अपघात टाळता येणार आहेत.
  यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधीनगर ते अहमदाबाद असा वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये प्रवासही केला.
  स्वदेशी सेमी-हाय स्पीड म्हणून ओळखली जाणारी ही ट्रेन अवघ्या 52 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठते.