1/7
कवठे येमाई ता.शिरुर येथील तीर्थक्षेत्र श्री येमाई देवी मंदिर हे पुण्यापासून ७० कि.मी अंतरावर आणि शिरुर-मंचर रोडवर कवठे गावच्या दक्षिणेस ३ कि.मी. अंतरावर असणारे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री येमाई देवी हे एक जागृत देवस्थान असून, या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांची मनोकामना, मनातली इच्छा पूर्ण होत असल्याने भक्त गणांची येथे नवस फेडण्यासाठी नेहमीच गर्दी होत असते.

2/7
चैत्र पौर्णिमेस होणारी देवीची यात्रा व नवरात्र उत्सवात तर १० दिवस या ठिकाणी मोठी गर्दी होत असते. या वर्षी कोरोना महामारी लक्षात घेत शासनाच्या आदेशाचे पालन करित यात्रा रद्द करण्यात आली असून देवीचे नवरात्र शासकीय आदेशाचे पालन करित दैनंदिन पूजाविधी, आरती करून साधेपणात करण्यात येत आहे.

3/7
कवठे येमाई गावास ऐतिहासिक वारसा लाभलेला असून गावाजवळून वाहणाऱ्या घोडनदीच्या पूर्व किनारी हे गाव वसलेले होते अशी अख्यायिका आहे. कवठे येमाई गावचे वैभव असलेल्या श्री येमाई देवीच्या प्राचीन मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला असून मंदिर परिसरास तीर्थ क्षेत्राचा दर्जाही प्राप्त झाला आहे.

4/7
मंदिर परिसरात सभोवताली असलेले मोठ-मोठे वटवृक्ष, मंदिराच्या उत्तरेस पायऱ्या असलेली ऐतिहासिक बारव (विहीर) आहे.

5/7
6/7
देवीच्या मंदिराच्या मागील बाजूस १५ फुट खोल दगडी बांधकामातील श्री महादेवाचे ऐतिहासिक मंदिर असून दगडी पिंड व दगडी नंदी हे या मंदिराचे वैशिष्ट आहे. याच महादेवाच्या मंदिरातून ३ की.मी. अंतरावर असणाऱ्या कवठे गावात असलेल्या राजवाड्यापर्यंत पूर्वी भुयारी मार्ग होता.

7/7
वार्षिक पिकपाण्याचा अंदाज घेण्यासाठी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेस सायंकाळी मंदिरासमोर असणारी सुमारे १२५ किलोग्रॅम वजनाची मोठी दगडी गोटी १३ जणांच्या उजव्या हाताच्या मधल्या एकच बोटाच्या सहाय्याने उचलली जाते. हा मान पिढ्यानपिढ्या मुंजाळवाडी ग्रामस्थांना आहे.