महाविद्यालयीन जीवनातील प्रेमात खाल्लेली ‘ठेच’ (Thech) आता मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. ‘ठेच’ (Thech Marathi Movie) हा मराठी चित्रपट १५ जुलैला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा टीझर (Thech Teaser Launch) सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. श्री नृसिंह फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत ठेच या चित्रपटाची निर्मिती शिवाजी बोचरे, ज्ञानदेव काळे, सय्यद मोईन सय्यद नूर, कैलास थिटे, श्रीराम वांढेकर, गजानन टाके यांनी केली आहे. लक्ष्मण सोपान थिटे यांनी चित्रपटाचं कथालेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. किरण कोठेकर, हेमंत शेंडे यांनी छायांकन, फैसल आणि इमरान महाडिक यांनी संकलन, तन्मय भावे यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे.