1/9
मीनल मोहाडीकर यांनी ८ मार्च १९९७ मध्ये ‘आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान’ची स्थापना केली. ‘महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रिकल्चर’च्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या. महाराष्ट्रासोबत गोवा, कर्नाटक आणि दुबईतही त्यांच्या संस्थेचा विस्तार झालाय. संस्थेच्या एकूण १८ शाखा आहेत.

2/9
वीणा पाटील यांनी १ एप्रिल २०१३ रोजी ‘वीणा वर्ल्ड’ची स्थापना केली. महाराष्ट्राच्या टुरिझम उद्योगाचा चेहरा म्हणून वीणा पाटील यांची ओळख आहे.  'केसरी टूर्स'मधून करिअरला सुरुवात करणाऱ्या वीणा पाटील गेली ३० वर्ष पर्यटन व्यवसायात आपला ठसा उमटवत आहेत.

3/9
अनिता डोंगरे हे फॅशन क्षेत्रातील मोठं नाव, ‘हाऊस ऑफ अनिता डोंगरे’ची त्यांनी स्थापना करून शेकडो ग्रामीण महिलांना रोजगार दिला. ‘अँड’ आणि ‘ग्लोबल देसी’ हे दोन ब्रँड देशातील पन्नासहून अधिक शहरात प्रसिद्ध आहेत.

4/9
जयंती कठाळे या मूळच्या नागपूरकर. आयटी क्षेत्रात शिक्षण आणि नोकरी केल्यानंतर त्या व्यवसायाकडं वळल्या. पूर्णबह्म नावाने त्यांनी सर्वात मोठं महाराष्ट्रीय रेस्टॉरंट बंगळुरूमध्ये सुरू केलं. जगभरात ५ हजार फ्रँचायझी उघडण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे.

5/9
नीता लाड या ‘क्रिस्टल ग्रुप ऑफ कंपनीज’च्या संचालक आहेत. सुरक्षा पुरवण्यापासून त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. २ लाखांपासून सुरू झालेला व्यवसाय आता ५०० कोटींच्या वर पोहोचला आहे. सिक्युरिटी, हाऊसकिपिंग, विमान कंपन्यांसाठी ग्राऊंड सर्व्हिसेस आणि केटरिंग असा त्यांच्या व्यवसायाचा विस्तार झाला.

6/9
श्वेता इनामदार या रेडिमेड ब्लाऊजचा व्यवसायासाठी महाराष्ट्रात ओळखल्या जातात. ‘इनामदार रेडिमेड ब्लाऊज कंपनी’ सुरु करून त्यांनी आपला व्यवसाय वाढवला. पुण्यातील एका दुकानापासून व्यवसायाला सुरुवात झाली. आज अनेक गृहिणींपासून अभिनेत्रींपर्यंत मोठा ग्राहक वर्ग त्यांच्याकडे आहे.

7/9
मनिषा धात्रक या ‘वरुण ऍग्रो प्रोसेसिंग फूड प्रायव्हेट लिमिटेड’च्या मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असणाऱ्या मनिषा यांनी टोमॅटो केचअप बनवण्यापासून उद्योगाला सुरुवात केली. टोमॅटोवर प्रक्रिया करणारी देशातली पहिली पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप कंपनी असा लौकिक त्यांच्या नावावर आहे.

8/9
मेधा मेहेंदळे या ‘तन्वी हर्बल’च्या संस्थापिका आहेत. महाराष्ट्रातील अनेक शहरांत त्यांची क्लिनिक्स असून त्यांच्या आयुर्वेदिक उत्पादनांना चांगला प्रतिसाद मिळतो.

9/9
सायली मराठे या आद्या या ज्वेलरी बँडच्या संस्थापिका आहेत. सात वर्षांपूर्वी नोकरी सोडून व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सध्या सिंगापूरमध्येही त्यांची एक फ्रँचायझी आहे.