1/9
रमाबाई रानडे : 
रमाबाई रानडे यांच्या ‘सेवासदन’नेच पहिली नर्स देशाला दिली. परंतु रमाबाईंनी १९१६ मध्ये ‘सबअसिस्टंट सर्जन’ हा अभ्यासक्रम सुरू केला. त्यासाठी विद्यार्थिनी मॅट्रिक पास व शास्त्रीय विषयाची प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण असली पाहिजे, ही अट होती. आजही नर्सिग 
कोर्ससाठी वेगळी सीईटी घेतली जाते. शंभर वर्षांपूर्वी ही सुरुवात रमाबाईंनी केली. केवढी दूरदृष्टी! शंभर वर्षांपूर्वी मुलींना शाळेतही जाण्यासाठी संघर्ष करावा लागायचा तिथे पुढचं शिक्षण घेऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभं करणं केवढं धाडसाचं काम पण रमाबाईंनी ते शंभर वर्षांपूर्वी केलं. अनेकींचं आयुष्य मार्गी लागलं.
रमाबाई रानडे : रमाबाई रानडे यांच्या ‘सेवासदन’नेच पहिली नर्स देशाला दिली. परंतु रमाबाईंनी १९१६ मध्ये ‘सबअसिस्टंट सर्जन’ हा अभ्यासक्रम सुरू केला. त्यासाठी विद्यार्थिनी मॅट्रिक पास व शास्त्रीय विषयाची प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण असली पाहिजे, ही अट होती. आजही नर्सिग कोर्ससाठी वेगळी सीईटी घेतली जाते. शंभर वर्षांपूर्वी ही सुरुवात रमाबाईंनी केली. केवढी दूरदृष्टी! शंभर वर्षांपूर्वी मुलींना शाळेतही जाण्यासाठी संघर्ष करावा लागायचा तिथे पुढचं शिक्षण घेऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभं करणं केवढं धाडसाचं काम पण रमाबाईंनी ते शंभर वर्षांपूर्वी केलं. अनेकींचं आयुष्य मार्गी लागलं.
2/9
ताराबाई शिंदे :
त्या काळात शिक्षणाने ताराबाईंचे व्यक्तिमत्व विकसित झाले होते. त्या मराठी, संस्कृत तसेच इंग्रजी शिकल्या. शिक्षणामुळे त्यांना वाचनाची फार आवड होती. स्त्री असूनही घोडा चालवायला शिकल्या. ताराबाई शेतीच्या कामात लक्ष घालीत तसेच कोर्टाचीही कामे करत. ताराबाई स्वभावाने तापट होत्या. एका स्त्रीची केशवपनासारख्या दुष्ट रूढी, तसेच पुरुषांना अनेक लग्न करण्याची असलेली मुभा या सर्व प्रश्नांवर टीका केलेली दिसते. तत्कालीन महाराष्ट्रातील स्त्री समाजसुधारक म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतदेखील सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात योगदान दिले. त्यानी स्त्रियांच्या शोषणाविरोधात दिलेला लढा हा सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेस चालना देणारा होता.
ताराबाई शिंदे : त्या काळात शिक्षणाने ताराबाईंचे व्यक्तिमत्व विकसित झाले होते. त्या मराठी, संस्कृत तसेच इंग्रजी शिकल्या. शिक्षणामुळे त्यांना वाचनाची फार आवड होती. स्त्री असूनही घोडा चालवायला शिकल्या. ताराबाई शेतीच्या कामात लक्ष घालीत तसेच कोर्टाचीही कामे करत. ताराबाई स्वभावाने तापट होत्या. एका स्त्रीची केशवपनासारख्या दुष्ट रूढी, तसेच पुरुषांना अनेक लग्न करण्याची असलेली मुभा या सर्व प्रश्नांवर टीका केलेली दिसते. तत्कालीन महाराष्ट्रातील स्त्री समाजसुधारक म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतदेखील सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात योगदान दिले. त्यानी स्त्रियांच्या शोषणाविरोधात दिलेला लढा हा सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेस चालना देणारा होता.
3/9
लक्ष्मीबाई टिळक :
लक्ष्मीबाई टिळक जशा बोलत तशाच लिहीत. त्यांच्या तोंडी आणि लेखी भाषेत फरक नसे, हीच त्यांच्या लिखाणाची यशस्विता. आज ८० वर्षांनंतरसुद्धा वाचकांचे ‘स्मृतिचित्रां’वर तेवढेच प्रेम आहे. आपली गोष्टीवेल्हाळ आजी आपल्या आयुष्यातल्या घटना सांगते, हा अनुभव प्रत्येकाला घ्यायला आवडतो. १५ डिसेंबर १९३४ रोजी ‘स्मृतिचित्रें’चा पहिला भाग तात्यासाहेब कोल्हटकरांनी प्रकाशित केला. त्यानंतर १, २ व ३ भाग १५ डिसेंबर १९३५ रोजी आणि ४ था भाग लक्ष्मीबाईंच्या पश्चात १५ डिसेंबर १९३६ रोजी वि. द. घाटे यांच्या हस्ते प्रकाशित झाला. यातील ११ प्रकरणे लक्ष्मीबाईंची आहेत. पुढली ५ प्रकरणे, मुलगा देवदत्त टिळकांनी लिहून ‘स्मृतिचित्रें’ पूर्ण केले. ‘स्मृतिचित्रें’ च्या ४० व्या वर्धापनदिनी लक्ष्मीबाईंचे नातू अशोक टिळक यांनी संपादित केलेली ‘संपूर्ण स्मृतिचित्रें’ची पहिली अभिनव आवृत्ती १५ डिसेंबर १९७३ रोजी स्वत: प्रकाशित केली.
लक्ष्मीबाई टिळक : लक्ष्मीबाई टिळक जशा बोलत तशाच लिहीत. त्यांच्या तोंडी आणि लेखी भाषेत फरक नसे, हीच त्यांच्या लिखाणाची यशस्विता. आज ८० वर्षांनंतरसुद्धा वाचकांचे ‘स्मृतिचित्रां’वर तेवढेच प्रेम आहे. आपली गोष्टीवेल्हाळ आजी आपल्या आयुष्यातल्या घटना सांगते, हा अनुभव प्रत्येकाला घ्यायला आवडतो. १५ डिसेंबर १९३४ रोजी ‘स्मृतिचित्रें’चा पहिला भाग तात्यासाहेब कोल्हटकरांनी प्रकाशित केला. त्यानंतर १, २ व ३ भाग १५ डिसेंबर १९३५ रोजी आणि ४ था भाग लक्ष्मीबाईंच्या पश्चात १५ डिसेंबर १९३६ रोजी वि. द. घाटे यांच्या हस्ते प्रकाशित झाला. यातील ११ प्रकरणे लक्ष्मीबाईंची आहेत. पुढली ५ प्रकरणे, मुलगा देवदत्त टिळकांनी लिहून ‘स्मृतिचित्रें’ पूर्ण केले. ‘स्मृतिचित्रें’ च्या ४० व्या वर्धापनदिनी लक्ष्मीबाईंचे नातू अशोक टिळक यांनी संपादित केलेली ‘संपूर्ण स्मृतिचित्रें’ची पहिली अभिनव आवृत्ती १५ डिसेंबर १९७३ रोजी स्वत: प्रकाशित केली.
4/9
मल्लिका अमर शेख :
मला उद्ध्वस्त व्हायचंय, असं बिनधास्तपणे म्हणणार्‍या मल्लिका अमर शेख या कवियत्री. आपल्या साहित्यातून त्यांनी समाजव्यवस्थेतल्या भ्रामक संकल्पना, पक्षपाती रूढी-परंपरा आणि ढोंगी पुरुषी मानसिकतेवर कोरडे ओढले आहेत. येडा होऊन पेढा खाणार्‍या वृत्तीवर तर त्या हातचं न राखून ठेवता तुटून पडतात. आपापल्या परीने जगणं सुंदर व्हावं म्हणून प्रयत्न करणार्‍यांमध्ये मला उद्ध्वस्त व्हायचंय असं बेधडकपणे म्हणायलाही मोठं धाडस लागतं. लपाछपीच्या कुबडीवर तोललेलं दुबळं आयुष्य जगणारे लोक पाहिले की केलेल्या चुका मान्य करून जबाबदारी स्वीकारणार्‍या लोकांचा मनाचा मोठेपणा भावल्याशिवाय राहात नाही. म्हणूनच गुळगुळीत मूल्यहीन औपचारिक जगणार्‍यांच्या जीवनशैलीला दोन शिव्या हासडून गावरान बाईनं कानउघाडणी करावी तशी मल्लिका अमर शेख यांची कविता वाचकांच्या मेंदूला झिणझिण्या आणते.
मल्लिका अमर शेख : मला उद्ध्वस्त व्हायचंय, असं बिनधास्तपणे म्हणणार्‍या मल्लिका अमर शेख या कवियत्री. आपल्या साहित्यातून त्यांनी समाजव्यवस्थेतल्या भ्रामक संकल्पना, पक्षपाती रूढी-परंपरा आणि ढोंगी पुरुषी मानसिकतेवर कोरडे ओढले आहेत. येडा होऊन पेढा खाणार्‍या वृत्तीवर तर त्या हातचं न राखून ठेवता तुटून पडतात. आपापल्या परीने जगणं सुंदर व्हावं म्हणून प्रयत्न करणार्‍यांमध्ये मला उद्ध्वस्त व्हायचंय असं बेधडकपणे म्हणायलाही मोठं धाडस लागतं. लपाछपीच्या कुबडीवर तोललेलं दुबळं आयुष्य जगणारे लोक पाहिले की केलेल्या चुका मान्य करून जबाबदारी स्वीकारणार्‍या लोकांचा मनाचा मोठेपणा भावल्याशिवाय राहात नाही. म्हणूनच गुळगुळीत मूल्यहीन औपचारिक जगणार्‍यांच्या जीवनशैलीला दोन शिव्या हासडून गावरान बाईनं कानउघाडणी करावी तशी मल्लिका अमर शेख यांची कविता वाचकांच्या मेंदूला झिणझिण्या आणते.
5/9
इरावती कर्वे :
उच्चशिक्षित, निरीश्वरवादी, बुद्धिप्रामाण्यवादी असलेल्या इरावती कर्वे यांचे संस्कृत भाषेवर देखील प्रभुत्त्व होते. आधुनिक विचारांच्या असूनही आपल्या संस्कृतीबद्दल असलेली आपलेपणाची व आपुलकीची दृष्टी त्यांच्या लिखाणातून दिसून येते. नातेसंबंधांबद्दल योगदान दिले. नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठात कुलसचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. १९३९ मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेजात मानववंशशास्त्र या विषयाच्या प्रपाठक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. १९५५ साली लंडन विद्यापीठात व्याख्याता म्हणून एका वर्षासाठी त्यांनी पद भूषवले. त्यांच्या 'युगान्त' या पुस्तकाला १९७२ चा साहित्य अकादमी तसेच महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
इरावती कर्वे : उच्चशिक्षित, निरीश्वरवादी, बुद्धिप्रामाण्यवादी असलेल्या इरावती कर्वे यांचे संस्कृत भाषेवर देखील प्रभुत्त्व होते. आधुनिक विचारांच्या असूनही आपल्या संस्कृतीबद्दल असलेली आपलेपणाची व आपुलकीची दृष्टी त्यांच्या लिखाणातून दिसून येते. नातेसंबंधांबद्दल योगदान दिले. नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठात कुलसचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. १९३९ मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेजात मानववंशशास्त्र या विषयाच्या प्रपाठक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. १९५५ साली लंडन विद्यापीठात व्याख्याता म्हणून एका वर्षासाठी त्यांनी पद भूषवले. त्यांच्या 'युगान्त' या पुस्तकाला १९७२ चा साहित्य अकादमी तसेच महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
6/9
समाजसेविका, अनाथांची आई, सिंधुताई सपकाळ :
समाजाने तिला काय दिलं हे, ती मोजत बसली नाही. पण तिच्याकडे जे काही होतं, ते मात्र तिने समाजावर उधळलं‌. आईचं जगणं हे सदैव असंच असतं. दु:ख स्वत:साठी अन् सुख मात्र लेकरांसाठी.
समाजसेविका, अनाथांची आई, सिंधुताई सपकाळ : समाजाने तिला काय दिलं हे, ती मोजत बसली नाही. पण तिच्याकडे जे काही होतं, ते मात्र तिने समाजावर उधळलं‌. आईचं जगणं हे सदैव असंच असतं. दु:ख स्वत:साठी अन् सुख मात्र लेकरांसाठी.
7/9
विजया मेहता :
विजया मेहता यांनी ’झिम्मा’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. हे नुसतेच आत्मचरित्र नाही, तर मराठी रंगभूमीचा इतिहास आहे असे प्रशंसकांचे म्हणणे आहे. विजया मेहता यांच्या नाट्य-कारकिर्दीवर 'बाई- एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास’ नावाचे पुस्तक आहे.
विजया मेहता : विजया मेहता यांनी ’झिम्मा’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. हे नुसतेच आत्मचरित्र नाही, तर मराठी रंगभूमीचा इतिहास आहे असे प्रशंसकांचे म्हणणे आहे. विजया मेहता यांच्या नाट्य-कारकिर्दीवर 'बाई- एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास’ नावाचे पुस्तक आहे.
8/9
भक्ती बर्वे :
भक्ती बर्वे केवळ अभिनेत्री नाही, तर उत्तम निवेदिकाही होत्या. त्यांचे उत्तम पाठांतर असल्याने त्यांना पुढे आकाशवाणीवर काम करण्याची संधी मिळाली. त्या दूरदर्शनवर निवेदन करीत होत्या. त्या उपजत अभिनेत्री असल्यामुळे त्यांनी केलेली जवळजवळ सर्वच नाटके सुपर हिट 
ठरली.  मराठी नाट्यक्षेत्रातल्या कामगिरीसाठी त्यांना १९९० साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. रजनीश 
जोशी यांनी लिहिलेलं 'एक होती फुलराणी' हे पुस्तक भक्ती बर्वे यांच्या बद्दलच्या खूप छान छान गोष्टींची आठवण करून देते.
भक्ती बर्वे : भक्ती बर्वे केवळ अभिनेत्री नाही, तर उत्तम निवेदिकाही होत्या. त्यांचे उत्तम पाठांतर असल्याने त्यांना पुढे आकाशवाणीवर काम करण्याची संधी मिळाली. त्या दूरदर्शनवर निवेदन करीत होत्या. त्या उपजत अभिनेत्री असल्यामुळे त्यांनी केलेली जवळजवळ सर्वच नाटके सुपर हिट ठरली. मराठी नाट्यक्षेत्रातल्या कामगिरीसाठी त्यांना १९९० साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. रजनीश जोशी यांनी लिहिलेलं 'एक होती फुलराणी' हे पुस्तक भक्ती बर्वे यांच्या बद्दलच्या खूप छान छान गोष्टींची आठवण करून देते.
9/9
गौरी देशपांडे :
विसाव्या शतकातील आधुनिक स्त्रीवादी साहित्यात लेखिका गौरी देशपांडे यांचं योगदान मोठं आहे. मराठीत कथा, कांदबरीकार म्हणून त्या 
परिचित आहेत. त्याचं सर्व साहित्य इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये अनुवादित झालं आहे. त्यांचे इंग्रजीतील कवितासंग्रहही प्रसिद्ध आहेत. गौरी यांनी अरेबियन नाईट्सचे सगळे खंड मराठीत आणले.
गौरी देशपांडे : विसाव्या शतकातील आधुनिक स्त्रीवादी साहित्यात लेखिका गौरी देशपांडे यांचं योगदान मोठं आहे. मराठीत कथा, कांदबरीकार म्हणून त्या परिचित आहेत. त्याचं सर्व साहित्य इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये अनुवादित झालं आहे. त्यांचे इंग्रजीतील कवितासंग्रहही प्रसिद्ध आहेत. गौरी यांनी अरेबियन नाईट्सचे सगळे खंड मराठीत आणले.